मा. श्री. सुभाष(बापू) सुरेशचंद्र देशमुख.
विद्यमान आमदार, सोलापूर दक्षिण मतदार संघ.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू म्हणजे जनमानसात आपले विशेष स्थान निर्माण केलेले व्यक्तिमत्व. संघटन कौशल्य आणि संवाद कौशल्य या गुणांसह सर्वांना जोडून घेत सुरुवातीपासूनच समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या बापूंनी सोलापूर जिल्ह्याला पुन्हा पहिले वैभव प्राप्त करून देण्याचा सदैव ध्यास घेतला.
शिस्तप्रिय, शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्या , सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व धार्मिक कुटुंबात १२ मार्च १९५७ रोजी बापूंचा जन्म झाला. बापूंचे आई वडील प्राथमिक शाळेतील शिस्तप्रिय शिक्षक म्हणून लोकप्रिय होते. घरच्या शेतीची कामे सांभाळून ते शाळेत ज्ञानदानाचे कार्य करीत असत. समाजसेवेचा वसा असल्याने त्यांनी निवृत्तीनंतरही कार्यरत राहून 'येडशी' येथे विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल चालू केले. तसेच त्यांच्या कुटुंबात वारीचीही परंपरा असल्याने घरात भक्तीचे वातावरण असे
कष्ट, शिस्त, राष्ट्रप्रेम व समाजसेवेचे बाळकडू बापूंना घरातूनच मिळाले. बापूंची कर्मभूमी सोलापूर व वडाळा. सोलापूर जिल्ह्यातील कापड गिरण्यांचा भरभराटीचा काळ ते ढासळती परिस्थिती हा प्रवास बापूंनी जवळून बघितला, अनुभवला. सुरुवातीपासूनच समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या बापूंनी सोलापूर जिल्ह्याला या परिस्थितीमधून वर काढून त्यास पुन्हा पहिले वैभव प्राप्त करून देण्याचा ध्यास घेतला. कुशल कामगारांच्या, कापड उद्योगांच्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध वारसा असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रात तसेच भारताच्या नकाशावर विशेष स्थान मिळावे हे ध्येय घेऊन बापू झटत राहिले
संघटन कौशल्य आणि संवाद कौशल्य हे बापूंचे मोठे गुण. कोणतेही कार्य करताना सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर ते यशस्वी होते हे जाणून बापूंनी सोलापूर जिल्ह्यासाठी काही करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांना नेहेमीच जोडून घेतले. "मानवाच्या आयुष्यात संवादाला खूप महत्व आहे. तुमचे विचार, तुमच्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायला संवादासारखं दुसरं माध्यम नाही. संवादामुळे अनेक प्रश्न सुटतात, समस्यांचे निराकरण होते." असं बापू म्हणतात. लोकमंगल मासिकातील 'संवाद' या आपल्या सदरामधून त्यांनी जनतेसमोर नियमितपणे आपले विचार मांडले.
तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे, धडधाकट शरीराचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, आपल्या पैशाचा विनियोग चांगल्या कार्यासाठी करावा, संकटांनी खचून न जाता प्रश्नांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे, प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागविले पाहिजे, सर्वांनी मिळून भ्रष्टाचाराला विरोध केला पाहिजे, हे बापूंचे विचार तरुणांसाठी नेहेमीच प्रेरणादायी ठरतात.
सामाजिक कार्याला आर्थिक जोड देण्यासाठी त्यांनी बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट सहकारी संस्था, साखर कारखाने अशा विविध वित्तीय व औद्योगिक संस्था उभ्या केल्या. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांची स्थापना, शेतकऱ्यांसाठी सुलभ कर्जवाटप तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रांची स्थापनाही केली. या विविध संस्था व योजनांमधून प्राप्त होणारा संपूर्ण नफा हा केवळ सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. मृदुभाषी स्वभाव, सर्वांना जोडून घेण्याची वृत्ती, संवाद साधण्याची कला, उत्तम निर्णयक्षमता यांमुळे बापूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
संघ परिवाराचा प्राथमिक सदस्य असणारा भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मजबूत पक्षांपैकी एक आहे. देशाच्या वेगवान प्रगतीचा अजेंडा केंद्रस्थानी ठेवत हा पक्ष उदयास आला आहे. राष्ट्रीय एकता, अखंडता, शक्ती यांप्रती पक्षाची व्यक्तिगत व राष्ट्रीय भूमिका नेहेमीच अविचल राहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह (आरएसएस) विस्तारलेला भाजप राष्ट्रीय ऐक्य, भारताची मूलभूत ओळख आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती यांसह नेहेमीच जोडलेला आहे. आज भाजपा सज्ज आहे एक मोठी झेप घेण्यासाठी, प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, आपल्या भावी पिढ्यांना अभिमान वाटावा अशा रीतीने आपल्या श्रेष्ठ भारताचा नवा इतिहास रचण्यासाठी. भारतीय जनता पक्षाचे विरोधकही हे मान्य करतात की भाजपाची यशस्वी घोडदौड रोखणे दुष्कर आहे.
सोलापूर जिल्ह्याची प्रगती साधण्यासाठी सुभाष(बापू) देशमुख सदैव कटिबद्ध आहेत. सोलापूरला जागतिक पातळीवर नेण्यासाठी अनेक योजना व उपक्रम आखले जात आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्पष्ट व्हिजन घेऊन बापू जोमाने कार्यरत आहेत. यातील काही महत्वाच्या मुद्द्यांचा हा परामर्ष...