पुस्तके

मा. ना. श्री. सुभाष(बापू) देशमुख यांचे अनमोल विचार, त्यांचा जीवनप्रवास आपल्याला उलगडून दाखवणारी ही पुस्तके. आपणांस ही पुस्तके पाठवण्यात आम्हाला नक्कीच आनंद मिळेल, पुस्तके मागविण्यासाठी येथे क्लिक करा.


पुस्तके मागवा

books

संवाद

मानवाच्या आयुष्यात संवादाला फार महत्व आहे. संवादामुळे आपले विचार व भावना इतरांपर्यंत सहज पोहोचविता येतात. संवादामुळेच अनेक प्रश्न सुटतात. याच विचारातून लोकमंगल या साप्ताहिकामध्ये आपले विचार मांडत बापूंनी जनतेशी संवाद साधला. अनेकविध विषयांवर लिहीलेल्या या लेखांना वाचकांचा उत्तम प्रतिसादही लाभला. या लेखांचे संकलन करून हे विचार 'संवाद' या पुस्तकाच्या रूपाने वाचकांपुढे ठेवण्यात आले आहेत.

books

संवाद - हिंदी

मराठी वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यालेल्या 'संवाद' चा हा हिंदी अनुवाद...
मानव जीवन में संवाद का बहुत महत्वपूर्ण स्थान है| अलग अलग विषयों पर संवाद करने से विचार बनते है| इन्ही विचारों की एक सुंदर पुस्तक प्रकाशित हुई, और हिंदी वाचकों के लिये उस पुस्तक का यह हिंदी अनुवाद प्रसिद्ध हुआ है|

books

एक हजार एक

मोजक्या शब्दांत मांडलेला उत्तम विचार म्हणजे सुविचार. जीवनातील विविध अनुभवांची प्रत्यक्ष अनुभूतीच हे सुविचार देतात. सुविचार केवळ वाचायचे नसतात, तर ते जगायचे असतात. बापूंच्या चिंतनातून, अनुभवातून, जीवनाचे उलगडलेले तत्वज्ञान सुविचारांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी ते 'एक हजार एक' या पुस्तकामार्फत प्रकाशित करण्यात आले आहेत.

books

लोकयात्री

राजकारण व समाजकारण यांचा जीवनदायी संगम साधणारे 'लोकयात्री' बापू... सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी सतत झटणारे सुभाषबापू हे खरे लोकनेते आहेत. जनसामान्यांसाठी, शेतकर्‍यांसाठी तळमळ असणार्‍या बापूंच्या अनेकविध पैलू असणार्‍या जीवनप्रवासाचे चित्रण सुरेखा शहा यांनी 'लोकयात्री' या पुस्तकामधून केले आहे. बापूंचे अनमोल कार्य हे विलक्षण स्फूर्तिदायी असून ते नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.