शिक्षणाविषयी ओढ, तळमळ याचा वारसा बापूंना त्यांच्या आई वडिलांकडून मिळाला. आई वडील शिक्षक असल्याने शिक्षणाचे, ज्ञानाचे संस्कार लहानपणापासूनच बापूंवर झाले. 'आपण ज्ञान संपादन करून त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करावयास हवा' ही शिकवण आई वडिलांनी त्यांना दिली. शिक्षणाविषयी विलक्षण बांधिलकी जपणार्या बापूंनी शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी सतत विचार केला व सर्वांना शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सदैव प्रयत्न केले.
समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे हा बापूंचा विचार. प्रामुख्याने, ग्रामीण भागातील सामान्य शेतकर्यांच्या मुलांना शिक्षण परवडले पाहिजे, तसेच शिक्षण रोजगाराभिमुख असावे याचा साकल्याने विचार करून बापूंनी श्रीराम प्रतिष्ठान मंडळाच्या माध्यमातून वडाळ्यासारख्या ग्रामीण भागात नवे शिक्षण संकुल सुरू केले. परिसरातील सामान्य शेतकर्यांच्या मुलांना याचा लाभ होत आहे. या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचा ध्यास घेऊन संकुलाची वाटचाल सुरू आहे.
वडाळा येथे असणार्या या शिक्षण संकुलामध्ये ऍग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्पुटर सायन्स, बायोइन्फॉर्मेटिक्स अशा विविध पदवी व पदविका अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. 'उद्योजकता विकास' या विषयातील बी.एससी चा पदवी अभ्यासक्रमही...
अधिक पहाशिक्षण संकुलामधील विद्यार्थी - विद्यार्थिनी विविध क्षेत्रांमध्ये भरघोस यश मिळवीत आहेत. शिक्षण संकुल उभारण्यामागचे उद्दिष्ट सफल होत असल्याचेच हे दर्शविते. येथील प्रत्येक महाविद्यालयात निरनिराळे प्रयोग केले जातात व त्यांना विद्यार्थी वर्गाचा मोठा प्रतिसाद...
अधिक पहाआज समाजात असणारी रोजगार निर्मितीसाठी योग्य प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन लोकमंगल प्रशिक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. या प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
अधिक पहादहावी व बारावी नंतर करिअर घडविण्याच्या दृष्टीने कोणता मार्ग निवडावा हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे नेहेमीच उभा असतो. या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अधिक पहाशालेय विद्यार्थ्यांमध्ये विद्याभ्यासासह विविध कलागुणांचाही विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धांच्या रूपाने एक व्यासपीठ प्रतिष्ठानच्या मार्फत उपलब्ध करून दिले जाते. यांपैकी एक उपक्रम म्हणजे सोलापूरमधील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयीन...
अधिक पहाभारताचा व महाराष्ट्राचा इतिहास शिकताना, समजून घेताना येथील गड किल्ले मोठी मोलाची भूमिका बजावतात. नव्या पिढीमध्ये इतिहासाबद्दल प्रेम निर्माण होण्यातही या गड किल्ल्यांचा मोठा वाटा असतो. हे लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गामध्ये इतिहास...
अधिक पहाविद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांचा विकास व्हावा आणि त्यांच्या अंगी सर्वगुणसंपन्नता यावी तसेच सभाधीटपणा वाढीस लागावा या हेतूने लोकमंगल प्रतिष्ठान व लोकमंगल नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. तसेच शिशुवर्गासाठी बडबडगीत स्पर्धेचे आयोजनही केले जाते. या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जातात.
शिक्षणाविषयी आत्यंतिक तळमळ असणार्या बापूंनी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच पुढील शिक्षणासाठी पाठबळ मिळावे यासाठी प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. यापैकी एक उपक्रम म्हणजे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, गणवेश यांचे मोफत वाटप केले जाते. याचबरोबर हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते.
शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशातून शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोकमंगल प्रतिष्ठान व लोकमंगल नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणार्या मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. मागील चार वर्षांत ४४ शिक्षकांचा सन्मान या पुरस्कारांद्वारे करण्यात आला आहे.