उद्योग व व्यवसाय

कष्ट, मेहनत यांनीच नशीब साकार होत असते या यावर विश्वास ठेवून बापू अखंड कार्यरत आहेत. सोळा वर्षे कंत्राटदारीच्या कामांचा व्यवसाय व त्यानंतर बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध डेअरी अशा वित्तीय व औद्योगिक संस्था बापूंनी उभ्या केल्या. एवढा औद्योगिक पसारा वाढल्यानंतरही निस्वार्थी वृत्तीने बापू समाजकार्य व राजकारण यांसाठी झटत आहेत.

बापूंनी अविरत चालू असणार्‍या आपल्या सामाजिक कार्याला आर्थिक जोड देण्यासाठी बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट सहकारी संस्था, साखर कारखाने अशा विविध वित्तीय व औद्योगिक संस्था उभ्या केल्या. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांची स्थापना, शेतकऱ्यांसाठी सुलभ कर्जवाटप तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रांची स्थापनाही केली. या विविध संस्था व योजनांमधून प्राप्त होणारा संपूर्ण नफा हा आजही केवळ सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. मोठ्या मेहनतीने उभे केलेल्या व स्थिरसावर झालेल्या या विविध उद्योग व व्यवसायांची धुरा जबाबदार व सक्षम खांद्यांवर सोपवून, कोणताही स्वार्थ न ठेवता बापूंनी आपले जीवन संपूर्णतः समाजकार्य व राजकीय कार्यासाठी वाहून घेतले आहे.


उद्योग व व्यवसाय

समाजसेवा करत असताना आर्थिक जोड म्हणून बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट, साखर कारखाने अशा वित्तीय व औद्योगिक संस्था उभा केल्या. शेतकऱ्यांना सुलभ कर्ज देण्यास सुरुवात झाली. महिला बचत गट, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. यातून मिळणारा नफा आजही केवळ सामाजिक कार्यासाठीच वापरला जातो.


लोकमंगल को - ऑप. बँक लि.

लोकमंगल समूहाची मुहूर्तमेढ बँकेच्या माध्यमातून झाली. सुशिक्षित बेरोजगार, लहान मोठे उद्योजक, शेती व्यावसायिक, दुर्बल घटक यांच्या सबलीकरणासाठी २८ एप्रिल १९९८ रोजी लोकमंगल बँकेचा शुभारंभ झाला. 'अखंड गतीतून सार्थकता ' हे ब्रीदवाक्य घेऊन ही बँक सक्षमपणे कार्यरत आहे. आयएसओ ९००१ : २००८ हे सर्टिफिकेट मिळवणारी ही पहिली बँक असून रिझर्व्ह बँकेचा ग्रेड वन दर्जाही प्राप्त केला आहे. वर्षातील ३६५ दिवस ग्राहकांना सेवा दिली जाते. बँकेकडे १२७ कोटींहून अधिक ठेवी आहेत तर ७९ कोटींहून अधिक कर्ज वाटप केले आहे. एनपीए थकीत कर्जाचे प्रमाण ३. टक्के असून ५३ कोटी २३ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सोलापूरबरोबरच उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र बँकेला मिळाले आहे.


लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लि.

शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक आणि उद्योजकांना नजरेसमोर ठेऊन २००४ मध्ये लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीची स्थापना करण्यात आली. मात्र खऱ्या अर्थाने संस्थेचे कामकाज २००८ पासून सुरु झाले. या अंतर्गत सोसायटी विभाग, डेअरी आणि खत विभाग कार्यरत आहे. सोसायटीची दूध डेअरी असून मंगळवेढा, करमाळा आणि सांगोला येथे शीतकरण केंद्रे आहेत. सोसायटीच्या माध्यमातून जैविक आणि रासायनिक खतांचे उत्पादन त्याचबरोबर इफको खताचे वितरक म्हणूनही काम पहिले जाते. सोसायटीचा स्वतःचा १५०० एकर शेती विभाग आहे. सोसायटीतर्फे आरटीजीएस. डीडी, चेक क्लिअरिंग, लाईट बिल व फोन बिल आदी सुविधा दिल्या जातात.


लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था

ग्रामीण अर्थकारण मजबूत करणारी लोकमंगल समूहातील तिसरी संस्था म्हणजे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था. ग्रामोद्योग, ग्रामविकास, शेती, लघुउद्योग, स्वयंरोजगार प्रकल्प, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहाय्य योजना असे पतसंस्थेचे कार्यस्वरूप आहे. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण व्यवहार व विश्वासाचे संचित यामुळे पतसंस्थेने ११५ कोटींहून अधिक ठेवी जमा केल्या आहेत तर ८७ कोटींचे कर्जवाटप केले आहे.


लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीज लि.

या कंपनीअंतर्गत साखर कारखाना, इथेनॉल आणि को-जनरेशन चालविण्यात येते. अवघ्या ६ महिने ६ दिवसांत कारखान्याचे बांधकाम व सामग्रीची उभारणी करून कंपनीने सर्वाधिक वेगात कारखाना उभारणीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. निर्यातक्षम साखर निर्मिती व तीन मेगावॅट वीजही निर्माण केली जाते. यापैकी निम्मी अंतर्गत वापरासाठी तर निम्म्या विजेची विक्री केली जाते. लोकमंगल शुगर इंडस्ट्रीज अँड को-जनरेशन हा आणखी एक साखर कारखाना लोकमंगल समूहाची शान वाढवत आहे.


ॲग्री क्लिनिक अँड ॲग्री बिझनेस सेंटर

या अंतर्गत कृषी पदव्युत्तर, पदवीधर, सर्व वयोगटासाठी स्वयंरोजगार योजना राबवली जाते. शेतकऱ्यांसाठी कृषी विकास, कृषी तंत्रज्ञान तसेच मार्केटिंग सुसूत्रता या संदर्भात प्रषिक्ष दिले जाते. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध संस्थान अंतर्गत हा उपक्रम राबविला जातो.


महाराष्ट्र रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर

पारंपरिक शेतीच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याच्या उपायासाठी काही तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने 'महाराष्ट्र रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर' ची स्थापना केली. संशोधन आणि त्याद्वारे विकास या गोष्टींचा अंगीकार करून या संस्थेने कार्याची गरुडझेप घेतली. शेतकरी, मग तो सुशिक्षित असो वा अशिक्षित असो तो आधुनिक तंत्रज्ञान समजू व अवलंबू शकेल या हेतूने संस्थेने सर्व प्रकल्प सुरु केले.


लोकमंगल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

आर्थिक सल्लामसलत, पतपुरवठा, आर्थिक समस्यांवरील उपाय या क्षेत्राशी निगडित असलेल्या मनुष्यबळाची उपलबद्धता पणन व इतर व्यावसायिक कामे, नवउद्द्योजकांना परिपूर्ण मार्गदर्शक सूत्र देणे, त्यांना चालना देऊन नवे उद्द्योग विकसित करणे हि कामे या कंपनीमार्फत करण्यात येतात. कंपनीचा कार्य आवाका सर्वक्षेत्रीय आहे. विविध उद्द्योग, व्यवसाय, उत्पादन व सेवांचा यात अंतर्भाव आहे. कार्याची व्याप्ती मल्टिनॅशनल असून पुणे येथे कंपनीचे मुख्यालय आहे.


लोकमंगल बायोटेक प्रा. लि.

२००६ मध्ये कृषी क्षेत्रावर आधारित जैविक उत्पादने घेणारी संस्था म्हणून हिची स्थापना करण्यात आली. नियोजित प्रगतिशील आराखडा आणि त्याची पूर्तता करण्याची क्षमता हे या संस्थेचे वैशिष्ट्य. ऑरगॅनिक फर्टिलायझर्स, बायो फर्टिलायझर्स, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स, स्ट्रेट फर्टिलायझर्स, सेकंडरी न्यूट्रिएंट्स, सीडस आदी उत्पादने या संस्थेमार्फत घेतली जातात. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, गुजरात आदी राज्यांमध्ये त्याचे वितरण केले जाते.


लोकमंगल प्रॉडक्ट्स लि.

धवल क्रांती करणारा हा प्रकल्प. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाकडे पहिले जाते. यातूनच २००१ मध्ये लोकमंगलडेअरी ची स्थापना करण्यात आली. लोकमंगलची दूध आणि दुग्धजन्य उत्पादनेही आहेत. ५०० हून अधिक संकलन केंद्रे, संपूर्ण संगणकीकरण, दूध उत्पादकांना मार्गदर्शन, बचत गटांचा सहभाग वाढविला आहे. सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच दूध पावडर प्रकल्प आहे.

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.