सोलापूर जिल्ह्याची प्रगती साधण्यासाठी सुभाष(बापू) देशमुख सदैव कटिबद्ध आहेत. सोलापूरला जागतिक पातळीवर नेण्यासाठी अनेक योजना व उपक्रम आखले जात आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्पष्ट व्हिजन घेऊन बापू जोमाने कार्यरत आहेत. यातील काही महत्वाच्या मुद्द्यांचा हा परामर्ष...
रस्ते व वाहतूक सुरक्षारस्ते व दळणवळण हे विकासातील सर्वात महत्वाचा घटक आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यातील रस्त्यांची सुधारणा, गावागावात खेड्याखेड्यापर्यंत जोडणाऱ्या उत्तम रस्त्यांची निर्मिती, सर्व गावे व शहरी भाग यांना जोडणारी शासकीय व कमी दरातील दळणवळण व्यवस्था तयार करणे. उत्तम स्थितीतील रस्ते निर्माण करून प्रवासातील वेळेची बचत करणे.
अधिकाधिक क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे. वृक्ष तोडीला आळा घालणे. संरक्षित वन क्षेत्राचा विस्तार वाढविणे. दुर्मिळ, औषधी तसेच पर्यावरण पूरक वृक्ष व झुडपांची लागवड करणे. वन्यजीव संरक्षण व संवर्धन करणे. वन संरक्षण, जंगल सफारी, पर्यटन विकासासाठी प्रोत्साहन यावर आधारित उद्योग निर्माण करणे.
आरोग्य व्यवस्थानागरिकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सुविधा पुरविणे. आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणांनी युक्त रुग्णालयांची निर्मिती. आरोग्य तज्ञ व वैद्यकीय तज्ञ डॉक्टरांची नेमणूक. आपत्कालीन उपचार सुविधा पुरविणे. औषध पुरवठा.
शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे. सर्व भाग सीसीटीव्ही यंत्रणेच्या नियंत्रणाखाली आणणे. पोलिस चौक्या अद्ययावत यंत्रणेसह सुसज्ज करणे व सर्वत्र सज्ज पोलिस चौकी व मुख्यालये स्थापन करणे. नागरिकांच्या तक्रारी व सूचना स्वीकारण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे. या समस्यांचे त्वरित निराकरण करणे. सुरक्षित व विश्वासार्ह न्यायव्यवस्था निर्माण करणे.
सोलापूर जिल्हा हा कायम लोकाभिमुख असावा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत राहणे. ठराविक स्तरामध्ये जिल्ह्याचा विकास अडकून किंवा बांधील ना राहता त्यासाठी सर्व जनतेला एकत्र घेउन प्रयत्न करणे व त्याचा लाभ सर्व जनतेला करून देणे. जात, धर्म, लिंग भेदापासून मुक्त माणसाने माणसासाठी म्हणून एकत्र येऊन सर्वसामान्यांचा सोलापूर जिल्हा घडवणे. आर्थिक भेदभाव
सोलापूर जिल्हा हा कायम लोकाभिमुख असावा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत राहणे. ठराविक स्तरामध्ये जिल्ह्याचा विकास अडकून किंवा बांधील ना राहता त्यासाठी सर्व जनतेला एकत्र घेउन प्रयत्न करणे व त्याचा लाभ सर्व जनतेला करून देणे. जात, धर्म, लिंग भेदापासून मुक्त माणसाने माणसासाठी म्हणून एकत्र येऊन सर्वसामान्यांचा सोलापूर जिल्हा घडवणे. आर्थिक भेदभाव
स्त्री जन्माचे स्वागत व स्त्रीभ्रूण हत्या रोखणे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक महिलेस शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. महिलांना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी नोकरी, व्यवसाय व रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणे. महिलांना समान संधी निर्माण करणे. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यासाठी प्रभावी उपाय तयार करणे. लैंगिक भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रम तयार करणे. महिलाना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे. गरीब महिला, विधवा आणि बेघर महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी सवलत दराने कर्जपुरवठा करणे. बाल कामगार पद्धतीचे पूर्णपणे निर्मूलन करणे.
युवा पिढी म्हणजे आपल्या समाजाचा कणा. युवा पिढीला शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम बनविणे म्हणजेच समाजाचे भविष्य घडविणे. युवा पिढीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. तरुणांसाठी सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील नवीन संधी निर्माण करणे. सांस्कृतिक केंद्रे, क्रीडा संकुल, प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती करणे.
शहरी भागासह ग्रामीण भागातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करणे. आर्थिक दुर्बल घटकांना मोफत शिक्षण पुरविणे. उत्तम व विविध अभ्यासक्रम शिकविणारी महाविद्यालये स्थापन करणे. रोजगाराभिमुख शिक्षण पुरविणे. शिक्षणासह तरुणांच्या अंगभूत कलागुणांना व कौशल्याचा विकास व त्यायोगे रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण पुरविणे.
सोलापूर जिल्ह्यातील वस्त्रोद्योगांना नवसंजीवनी देणे. त्याच बरोबर इतर विविध क्षेत्रातील उद्योग सोलापूरमध्ये आणणे. सोलापुरात आयटी क्षेत्राचा विकास घडवून आणणे व सोलापूरला आयटी हब म्हणून विकसित करणे. विविध उद्योग, आयटी क्षेत्राद्वारे रोजगार निर्मिती करणे. सोलापुरातील तरुणांना तसेच महिलांना नोकरी, व्यवसायाच्या नवनवीन संधी निर्माण करणे.
सोलापुरातील वस्त्रोद्योग जगप्रसिद्ध आहेत. या उद्योगांना नवसंजीवनी प्राप्त करून देणे. येथे पिकणार्या कापसावर येथेच प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करणे. चादरी, टॉवेल, साड्या, घोंगड्या या इथल्या प्रसिद्ध व पारंपारिक कापड उत्पादनांसह विविध प्रकारचे तयार कपडे(गारमेंट्स) व युनिफॉर्म्सची निर्मिती वाढविणे. सोलापूर जिल्ह्याची युनिफॉर्म / गारमेंट हब ओळख निर्माण करणे.
सोलापुरातील वस्त्रोद्योगांना नवसंजीवनी देताना या पारंपारिक उद्योगांमध्ये धाग्यांसह रेशीम, लोकर व अपारंपारिक तंतू निर्मिती व वापर याचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणे. कापूस, रेशीम यांच्या उत्पादनासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देणे. शेती पूरक अन्य जोड व्यवसायांसाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण देणे. शेती उत्पादनांचा दर्जा वाढावा यासाठी मातीचा कस राखणे. त्यासाठी सेंद्रिय खते, दर्जेदार बियाणे पुरविणे. सोलापुरात रेशीम उद्योगांना नवी झळाळी प्राप्त व्हावी, अधिकाधिक शेतकर्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावे यासाठी रेशीम शेतीची माहिती पुरविणे, रेशीम कोष खरेदी केंद्रांची स्थापना करणे.
कृषिप्रधान असणार्या आपल्या भारत देशात व महाराष्ट्रात शेती हे बहुतांश जनतेच्या उपजीविकेचे साधन आहे. शेतीसाठी सुधारित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्यासाठी प्रशिक्षण पुरविणे. बी बियाणे, खते, अवजारे पुरविणे. शेतमालाच्या विक्रीसाठी सुविधा पुरविणे. शेती बरोबरच शेतीपूरक उद्योगांसाठी प्रोत्साहन देणे. या उद्योगांमध्ये वाढ घडवून आणणे. शेती उत्पादनांसाठी बाजार मिळवून देणे.
महाराष्ट्र राज्यातील सिंचन व्यवस्थेचे जाळे फार मोठे आहे, परंतु आता हे दुर्दैव आहे की पाण्याचा उपलब्ध साठा कमी होत चालला आहे आणि पाण्याची गरज मात्र वाढत जात आहे. योग्य पद्धतीने पाण्याचा वापर यातुन हा प्रश्न सोडवता येऊ शकेल. सिंचनाचे अत्याधुनिक मार्ग वापरून सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणे. भूगर्भात पावसाचे पाणी जिरवणे, शेतीसाठी पाणी वापराच्या दृष्टीने अत्याधुनिक प्रशिक्षणाची सोय करणे. शाळा कॉलेज व सर्व शिक्षण संस्थांमधून पाणी वापर व हरित सोलापूर या दृष्टीने शिक्षण देऊन पुढील पिढीस त्या दृष्टीने सजग बनवणे. जनसामान्यांच्या सहभागातून हरित सोलापूर ची निर्मिती करणे.
शहर आणि ग्रामीण भाग यात असलेली व्यवस्था व सुविधा यांचा असलेला फरक कमी करत जाऊन तो पूर्ण दूर करणे यादृष्टीने योजना करणे. ग्रामीण भागातील निसर्ग संपत्तीचे सुयोग्य जतन करणे. शहरी भागातील उपलब्ध व्यवसाय व नोकरीच्या सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध होतील या दृष्टीने प्रयत्न करणे. शिक्षणाच्या अद्ययावत शाखा व सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, व्यवसाय यांना डिजिटलायझेशन साठी मार्गदर्शन व मदत मिळवून देणे.