सामाजिक योगदान

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापूंनी सुरुवातीपासून समाजसेवेचे व्रत स्वीकारत सोलापूर जिल्ह्याला पहिले वैभव प्राप्त करून देण्याचा ध्यास घेतला. समाजाचा संपूर्ण विकास साधण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे हे बापूंचे ठाम मत.

बापूंनी शिक्षण, आरोग्य, जल संधारण, वृक्ष लागवड, ज्येष्ठ नागरिकांना आधार, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह यांसारख्या विविध माध्यमातून अनेक समाजोपयोगी योजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. यांसाठी जनतेचा पाठिंबा व सक्रिय सहभागही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाते. लहान मुलांसाठी किल्ला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या आयोजनामार्फत लहान मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते.

service

अन्नपूर्णा योजना

ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा आधार. परंतु ज्या ज्येष्ठांना कौटुंबिक आधार नाही त्यांच्या वाटेला उपेक्षा येऊ नये, त्यांचे हाल, उपासमार होऊ नयेत यासाठी 'अन्नपूर्णा योजना' राबविली जाते. या अंतर्गत सुमारे ५०० वृध्द व निराधार ज्येष्ठ नागरिकांना दररोज दोन वेळा मोफत भोजन घरपोच पुरविले जाते. सोलापूरसह उस्मानाबादमध्ये ही सेवा गेली ५ वर्षे अविरतपणे सुरु आहे.

अधिक पहा
service

वृक्ष लागवड

सोलापूर जिल्हा हिरवा व पर्यावरण समृद्ध व्हावा यासाठी बापूंचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर सर्वप्रथम येथील वृक्षतोड थांबावयास हवी तसेच अधिकाधिक झाडे लावली जाऊन त्यांचे संगोपन व संवर्धन करणेही तेवढेच महत्वाचे असते. यासाठी २०१२ या वर्षापासून पासून सोलापूर मध्ये 'वृक्ष संगोपन' योजना सुरु करण्यात आली. गेली ५ वर्षे अविरतपणे सुरु आहे.

अधिक पहा
service

जलसंधारण

मानवी जीवनाची सर्वात मोठी गरज म्हणजे पाणी. आज पाण्याची परिस्थिती सर्वत्र गंभीर बनत चालली आहे. एकीकडे विकासाकडे वाटचाल सुरू असताना पाण्याचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. यावर वेळीच उपाय केले नाहीत तर भविष्यात पाण्याचे मोठे संकट समाजापुढे उभे राहील. लोकसहभागातून पुढाकार घेत बापूंनी 'पाणी जिरवा' या योजने अंतर्गत अनेक कामे केली.

अधिक पहा
service

आरोग्य

समाजाला सशक्त बनवण्यासाठी सर्व समाज घटकांचे आरोग्य उत्तम राखणे आवश्यक असते. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाते. या योजनेअंतर्गत आजवर हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. बेताची आर्थिक परिस्थिती हा उपचारांमधील अडसर ठरू नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट संचालित “लोकमंगल जीवक हॉस्पिटल..

अधिक पहा
service

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

विवाह सोहळा म्हणलं की खर्च वाढतो. शेतकरी, कष्टकरी समाजाची बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुला मुलींच्या विवाहासाठी बरीच आर्थिक ओढाताण होते. हे लक्षात घेऊन बापूंनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. या योजने अंतर्गत आजवर अडीच हजारपेक्षा जास्त मुलींचे विवाह लावून देण्यात आले आहेत. हे कार्य गेली १३ वर्षे जोमाने सुरू आहे. या योजनेमध्ये विवाह तर मोफत..

अधिक पहा
service

विद्यादान

शिक्षण हा सशक्त समाजाचा पाया असतो हे ओळखून समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी बापूंनी अविरत प्रयत्न केले. बापूंनी सुरू केलेल्या विद्यादान योजने अंतर्गत दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी समाजातील २५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या भोजन, शिक्षण व निवासाची व्यवस्था केली जाते. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देत राष्ट्रीय..

अधिक पहा

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.