
समाजकारण आणि समाजसेवेची शिकवण लहानपणापासूनच मिळालेल्या सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि कष्टाच्या जोरावर जीवनातील अनेक अडचणींवर मात केली. माणूस मनापासून प्रयत्न करत राहिला, तर कोणतेही ध्येय गाठू शकतो, हे त्यांच्या प्रवासातून दिसून येते. सर्वसामान्य कुटुंबात आणि चांगल्या संस्कारांच्या वातावरणात वाढलेल्या बापूंनी समाजासाठी काहीतरी करण्याच्या विचारातून राजकारणात प्रवेश केला. आज ते दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करत आहेत. सोलापूरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. आपल्या कामामुळे त्यांनी सोलापूरच्या जनतेमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सोलापूरच्या मातीत वाढलेले सुभाषबापू उद्योग, व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारण या विविध क्षेत्रांमध्ये सक्रियपणे काम करत आले आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. सोलापूरच्या विकासासाठी त्यांच्या मनात एक स्पष्ट विचार आणि दिशा आहे. त्यानुसार ते सातत्याने काम करत आहेत. भाजपा सरकारच्या कार्यकाळात त्यांनी सहकार, मदत आणि पुनर्वसन यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. या काळात महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी त्यांनी काम केले. समाजातील सामान्य माणसाच्या गरजा आणि अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या कामाची मुख्य भूमिका राहिली आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू हे भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ व प्रमुख सदस्य. मृदुभाषी स्वभाव, संवाद साधण्याची कला, सर्वांना जोडून घेण्याची वृत्ती, संघटन कौशल्य, उत्तम निर्णयक्षमता या गुणांमुळे बापूंना नेहेमीच कार्यकर्ते व जनतेचा विश्वास आणि उत्तम पाठिंबा लाभला आहे.
१९९८ सालच्या जानेवारी महिन्यात झालेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युन्नुसभाई शेख यांचा पराभव करून बापूसाहेबांची आमदारपदी निवड झाली.
कष्ट आणि मेहनत केली तरच माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो, असा बापूंचा विश्वास आहे. या विचाराने ते सतत काम करत आले आहेत. बापूंनी सुरुवातीला १६ वर्षे कंत्राटदारीचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांनी बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट सहकारी संस्था, साखर कारखाने आणि दूध डेअरी अशा विविध संस्था व व्यवसाय सुरू केले. या सर्व कामांचा विस्तार झाल्यानंतरही त्यांनी समाजासाठी काम करणे आणि राजकारणात काम करणे सुरूच ठेवले.
मेहनतीने उभे केलेले हे व्यवसाय आणि संस्था योग्य व सक्षम लोकांकडे सोपवून बापूंनी स्वतःला समाजसेवा आणि राजकीय कामासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला. कोणताही वैयक्तिक फायदा न पाहता ते समाजासाठी आणि लोकांच्या कामासाठी सतत काम करत आहेत.

बापूंच्या सामाजिक कार्याचा आढावा शब्दांत मांडणे तसे कठीणच. शिक्षण, आरोग्य, जल संधारण, वृक्ष लागवड, ज्येष्ठ नागरिकांना आधार, आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यांसारख्या अनेक उपक्रमांतून बापूंनी जनसेवेचा अखंड वसा जपला आहे.
अन्न व पोषणज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र काही ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाकडून आवश्यक मदत मिळत नाही. अशा ज्येष्ठ नागरिकांना जेवणासाठी अडचण येऊ नये आणि त्यांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी 'अन्नपूर्णा योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून सुमारे ५०० वृद्ध आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना दररोज दोन वेळचे मोफत जेवण त्यांच्या घरी पोहोचवले जाते. सोलापूर आणि उस्मानाबाद येथे गेल्या ५ वर्षांपासून ही सेवा सुरू आहे. आतापर्यंत १४ लाखांपेक्षा अधिक जेवणाचे डबे वितरित करण्यात आले आहेत.
स्वार्थ आणि अहंकार यांच्या वाऱ्यापासून दूर राहिलेला माणूस सेवावृत्तीने कसं नवरचनात्मक कार्य करू शकतो, याचं दर्शन श्री. देशमुखांच्या अनेक संस्थांपासून घडू शकते.
- स्व. डॉ. निर्मलकुमार फडकुले
@SubhashDeshmukhOfficial • अधिकृत फेसबुक पेज