विवाह सोहळा म्हणलं की खर्च वाढतो. शेतकरी, कष्टकरी समाजाची बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुला मुलींच्या विवाहासाठी बरीच आर्थिक ओढाताण होते. हे लक्षात घेऊन बापूंनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. या योजने अंतर्गत आजवर अडीच हजारपेक्षा जास्त मुलींचे विवाह लावून देण्यात आले आहेत. हे कार्य गेली १३ वर्षे जोमाने सुरू आहे.
या योजनेमध्ये विवाह तर मोफत होतोच परंतु त्याचबरोबर या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटपही केले जाते. याचबरोबर व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. या योजनेचा लाभही अनेक जोडप्यांना झाला आहे.

